Tuesday, January 12, 2016
Monday, October 31, 2011
Wednesday, June 23, 2010
Friday, April 30, 2010
झटपट स्वयंपाक!
पातेल्यातली भाजी केव्हा शिजेल हे बघण्यातला वेळ वाचवायचा आहे?
मग हे करा :
१) छोट्या कुकरमध्ये नेहेमीप्रमाणे फोडणी, मिरची, कांदा, ई टाका.
२) ग्रेव्ही ची भाजी करायची असल्यास तशी चटणी आणि पाणी पण टाका
३) कुकर मध्येच कापलेली भाजी टाका
४) कुकर चे झाकण लावून भाजी शिजेल इतक्या शिट्या होऊ द्या (प्रत्येक भाजीनुसार हा अंदाज अनुभवाने येईल)
पातेल्या ऐवजी कुकर वापरल्यामुळे नक्कीच बराच वेळ वाचतो
६) कुकरची शिट्टी वाजत असतांना हे गाणे नक्की गुणगुणा:
"सिटी बजाके बोल, ALL IZZ WELL":-)
वर्गीकरण- स्वयंपाक
Thursday, February 25, 2010
तुझाच मी
या वर्षी 'दोनाचे चार' हात होण्याचा योग आला आहे आणि मग 14 फेब्रुवारी म्हणजेच 'व्हॅलेंटाईन-डे' च्या मुहुर्तावर मी 'होणार्या ही' ला मी सध्या लिहिलेल्या काही चारोळ्या भेट दिल्या.
_______________________________________
_______________________________________
_______________________________________________
_______________________________________________
________________________________________________
________________________________________________
_________________________________________________
या चारोळीसाठीची मूळ चारोळी - चंद्रशेखर गोखले यांच्या 'मी-माझा' मधली :
_________________________________________________
मूळ चारोळी 'मी-माझा' मधली :
_______________________________________________
मूळ चारोळी 'मी-माझा' मधली :
________________________________________________
तश्या ह्या काही दिवस आधीच सुचल्या, पण मुहुर्तानुसार भेट दिल्या :-)
'तुझाच मी' असे शिर्षक देण्यामागचा एक हेतू म्हणजे 'दोनाचे चार' साठीचे प्रयत्न आता संपले आहेत हे दर्शवण्यासाठी :-) आणि 3-4 चारोळ्यांमध्ये चंद्रशेखर गोखले यांच्या 'मी माझा' मधल्या काही चारोळ्यांचे यमक वापरले आहेत.
जेव्हा जेव्हा असे साम्य आहे तेव्हा original चारोळी सोबत दिलीच आहे.
'मी माझा' चारोळ्यांचा तर मी चाहता आहेच. त्या सर्व चारोळ्या ईथे आहेत: http://www.meemaza.com/
© मिलिंद
http://gulakand.blogspot.com/
Thursday, January 28, 2010
बे एकं बे
लग्न म्हणजे दोनाचे चार हात केले असं म्हणतात तर एंगेजमेंट ला काय म्हणायचं- दोनाचे तीन हात?
तसं पाहीलं तर एंगेजमेंट ला एक हात मिळतोच हातात- एंगेजमेंट रिंग घालतांना- मग 'दोनाचे तीन' झालेत की नाही?
:-)
आणि लग्नात दोन हात मिळतात...मिळतात तर एकदम गळ्यातच पडतात! - वरमाला घालतांनाचं म्हणतोय अहो मी :-)
मग झालेत की नाही 'दोनाचे चार' ?
:-)
अजून एक जोक:
ती: तू तर माझ्याशी लग्न करायला एका पायावर तयार होतास...
तो: होना, मी एका पायावर तुझ्यासाठी तयार होतोच, आणि दुसर्या पायावर दुसरीसाठी !
वर्गीकरण- मजेशीर
Saturday, December 19, 2009
कवी असण्याचे side effects (चांगले आणि वाईट)
* कवींबद्दल लोकांची अशी समजूत असते की ते सगळेच शामूळ, कच्च्या दिलाचे, सगळ्या decisions डोक्याने विचार न करता emotionally घेतात etc
- मला असे काही कवी माहिती आहेत जे कठीण कोडी पण सोडवू शकतात (डोक्याने विचार करुन), real life मध्ये पण खूप successful आहेत, खुप पैसा पण कमवतात (मला थोडा वेळ द्या, मी पण कमवण्याच्या मार्गावरच आहे :) )
* प्रेमकविता तर आहेतच पण प्रेमभंगासारखे किंवा पराभवाचे दु:ख कवितेत सहजतेने व्यक्त करता येते :)
त्यामुळेच कवी लोकांमध्ये दारु सारखे व्यसन असणारे किंवा आत्महत्येसारखा अखेरचा विचार करणारे खूप कमी असावेत :)
माझ्या आयुष्यातले असे काही प्रसंग आठवतात की एखाद्या घटनेमूळे १-२ दिवस डोकं सुन्न झालं.. सुखाचे, दु:खाचे किंवा ज्यांना out of this world असे म्हणता येईल असे प्रसंग...
तेव्हा काहीच शब्द पण सुचले नाहीत, पण मग त्या strong भावना व्यक्त करायला वाक्यांऐवजी direct कविताच सुचली!
कविता एक प्रकारची emotionally balanced personality देतात आणि आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात असं मला वाटतं.
कोणीतरी कुठेतरी म्हटलंच आहे की मनाच्या संवेदनशीलतेही एक सामर्थ्य असतं
* अजुन एक side effect: तुम्ही दुसर्या प्रकारच्या कितिही कविता लिहा, त्यांच्या real life च्या relation बद्दल कोणी जास्त विचारणार नाही.
पण..पण..तुम्ही एखादी romantic कविता लिहिलीत की direct confidently प्रश्न विचारला जातो की,
"काय मग, कोण आहे ती? नाव तर सांग"
किंवा "पुढे काय झालं?"
किंवा "ही या कवितेतली आपल्या office मध्ये तिथे बसणारी हीच का?" :-)
मग मी कितीही सांगीतलं की कविता बर्याचदा काल्पनिक असू शकतात तरी लोकांचा romantic कवितेबद्दल तर मुळीच विश्वास बसत नाही!
अशावेळी मग मी भाव खाऊन सांगतो की ही कविता खरी की काल्पनिक ते माझं secret आहे ;-)