Saturday, July 08, 2006

काकांच्या मिशा

लहानांसाठी आणि मोठयांमधल्या लहानांसाठी..
त्या काकांचा फोटो नाहीये, पण कवितेचे शब्द पुरेसे ठरावेत :)

काकांच्या मिशा


काका आमचे रुबाबदार
काकांच्या मिशा झुपकेदार

काकांचा आहे राजेशाही थाट
मिशा त्यांच्या खूपच दाट
विणून होईल अख्खी खाट

काका आमचे रुबाबदार
काकांच्या मिशा झुपकेदार

काकू जेव्हा रागावतात
काका नुसतेच हसतात
मिशांवरुन हात फिरवतात

काका आमचे रुबाबदार
काकांच्या मिशा झुपकेदार

पण काका जेव्हा रागावतात
मिशांच्या तलवारी उपसतात
तेव्हा सगळेच घाबरतात

काका आमचे रुबाबदार
काकांच्या मिशा झुपकेदार

काकांच्या मिशा कशा दिसतात सांगू?
नारळाच्या झाडाच्या लोंबत्या फांद्या जणू
खोट्या आहेत का मिशा? चला तर ताणू!

काका आमचे रुबाबदार
काकांच्या मिशा झुपकेदार

काका मिशांना फार जपतात
वारंवार त्यांना कंगव्याने सावरतात
दर रविवारी कलपाने रंगवतात

काका आमचे रुबाबदार
काकांच्या मिशा झुपकेदार

ही कविता वाचून काका आधी रागावले
मग त्यांनी मला शंभराचे बक्षीस दिले
अन्‌ मिशीवर त्यांच्या मूठभर मांस (केस) चढले

काका आमचे रुबाबदार
काकांच्या मिशा झुपकेदार

3 comments:

Akira said...

Milind,

Good one. Kakancha chitra dolyasamor ubha rahila.

Herez a suggestion for the 1st stanza

pahila kadwa -
Misha tyancha itkya daat ki vinun hoeel akhhi khaat

Milind said...

धन्यवाद Akira

Anonymous said...

मस्त गंमतीशीर झाली आहे ही कविता! I will note it down for my niece.
कविता सगळ्यांनाच जमत नाहीत. Keep it up.
and yes, माझ्या स्केचवरील प्रतिक्रियेसाठी आभारी आहे.