Sunday, July 23, 2006

पाऊस, ब्लॉग...

परवाचीच गोष्ट. हलका हलका पाऊस पडत होता. छत्री घेऊन कामानिमित्त बाहेर पडलो होतो. थोड्या वेळानंतर लक्षात आले की पाऊस थांबून बराच वेळ झालाय पण छत्री उघडलेलीच राहीली आहे.
कुणी ओळखीचे पाहात नाहीये ना हे पाहून मग पटकन छत्री बंद केली :-)
तेव्हा लक्षात आले की मनात विचारांचा पाऊस पडतोय. आता या पावसासाठी कुठली छत्री वापरावी? वापरायची कशाला? या विचारधारांत चिंब होण्याचा वेगळाच आनंद आहे.
Descartes नावाच्या तत्वज्ञाने म्हटलेच आहे की 'मी विचार करतो म्हणूनच मी अस्तीत्वात आहे'.
-------------------------------------------------------------------------------------------
ब्लॉग

आपण ब्लॉग का लिहितो?
यावर विविध मते वाचली किंवा ऐकली आहेत. मुख्यत: आपले मत आणि भावना व्यक्त करण्यासाठी ब्लॉग हे एक सोयिस्कर माध्यम आहे. अजून एक उद्देश असा असेल की आपल्या मतांना, विचारांना सोबती शोधण्यासाठी आपल्या मनमोराच्या पिसाऱ्यातील (किंवा पसाऱ्यातील म्हणा हवं तर ;-)) पीसे आपण आपल्या ब्लॉगवर उतरवत असू. "Birds of same feathers flock together" ही इंग्रजीतली म्हण इथे नमूद करावीशी वाटते.

4 comments:

Anonymous said...

सुंदर निरिक्षण!

Milind said...

धन्यवाद, शैलेश.

Akira said...

Vicharanna pawasachya sarinchi dileli upama awadali...

Rainwater harvesting sarkha kahi tantra ahodhayla pahije :)

Milind said...

diary/blog ek prakare Rainwater harvesting sarkhech aahet ki :-)