Saturday, March 31, 2007

गुलकंद




आयुष्य असावे गुलकंदासारखे..अनुभवांचे अर्क साठवणारे..काटे झेलुनही पाकळ्यांनी सजणारे.

शोधीत गुलाब मज जेव्हा काटा बोचतो, लाल टपोरा रक्तबिंदू बोटावर ओघळतो.

उष्ण, चैतन्यमय त्या लाल बिंदूने गुलकंदाच्या लालीत अन्‌ गोडीत अजून भर पाडते..
गुलकंदाला एक जिवंतपणा येतो.

आता बोटाने मी गुलकंद चाखतोय की तो रक्तबिंदू-माझे मलाच कळेना!

पण गुलाबाचा सुगंध जेव्हा दरवळतो, गुलकंदाची गोडी जिभेवर रेंगाळते,
तेव्हा उत्साही रक्त सळसळतेच!

No comments: