Sunday, May 14, 2006

शुभारंभ

प्रथेप्रमाणे गणरायाला वंदन करुन या blog ची सुरुवात करतोय.



दगडूशेठ गणपतीच्या या देखण्या रुपाची स्तुती कितीही केली तरी कमीच. वारंवार पहात रहावे असे ते श्रीमंत, लोभस रुप!

मराठी कवितेतल्या काही ओळी मनात घर करुन राहिल्या आहेत. त्या या पहील्या लेखात नमूद करतो:

"या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे,
शंभर मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी.
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे,
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे..."

यातली "इथल्या पिंपळपानावरती ..." या ओळी कुठल्याही जुन्या पिंपळाच्या झाडाखाली बसल्यावर हमखास मनात येतात. विशेषतः कॉलेजातल्या झाडाखाली!

अजूनही काही आवडत्या ओळी म्हणजे कुसुमाग्रजांच्या या ओळी:

"सह्याद्रीवर लक्ष उदयांची पहाट मंथर जागत आहे,
तुझ्याचसाठी लाख रवींचे गर्भ सुखाने साहत आहे"

या मोजक्याच शब्दांत फार मोठा आशावाद व्यक्त झाला आहे.

3 comments:

Anonymous said...

hi GulKand nakki konasathi :-)) ?

-Jaydeep.

Milind said...

रोहितने उल्लेख केल्याप्रमाणे:

"दिसामाजी काहीतरी ते लिहावे ।
प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ॥"

याचे पालन करण्याचा संकल्प सोडला आहे. दिसामाजी नाही तरी कधीतरी लिहित जाईन :)

Mandar Behere said...

छान लिहितोस.
"या जन्मावर या जगण्यावर" हे माझे पण अतिशय आवडते गाणे आहे. काय सुंदर ओळी आहेत या गाण्याच्या!

"लिहिणार्‍याने लिहीत जावे, वाचणार्‍याने वाचत जावे" :)

Best of luck.