Sunday, May 14, 2006

गोदाकाठचे संस्कार

मी अकरावी व बारावीला नाशिकला असतानाची गोष्ट. कॉलेज गोदावरीच्या काठी असल्याने मी आणी एक मित्र एक-दोन तास लवकर जाउन Boating करायचो.

कॉलेजच्या Boat Club जवळून जाणाऱ्या गोदावरीचे पात्र रामकुंड अजुन पुढे असल्याने स्वच्छ होते. Dinghy boat, pedal boat चालवणे व्यवस्थीतपणे शिकलो होतो. फार मजा यायची त्यात! एकट्याने boat नेणे आणि आणणे यात बराच व्यायाम व्हायचा. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जातांना फार जोर लावून वल्हे मारावे लागत असत.



त्या गोदावरीच्या काठी मी बऱ्याचदा तासभर बसत असे. अभ्यासामुळे, धावपळीने आलेले दडपण त्या प्रवाहाकडे पाहून दूर पळून जायचे. मन उल्हासित व्हायचे. पाण्याचा प्रवाह पाहून मनातही विचारांचा प्रवाह सुरु होई. जणू जीवनात सतत पुढे जाण्याचा संदेश तो गोदेचा प्रवाह देत असे.

"एखाद्या गोष्टीसाठी वाहून घेणे" हा शब्दप्रयोग कदाचित नदीच्या प्रवाहावरून तर नाही आला? जनसेवेसाठी तिने स्वतःला वाहून घेतलेले असते.

सर्वच गोष्टी मला शब्दांत नाही सांगता येणार पण गोदेच्या त्या कधी शांत तर कधी वेगवान असणाऱ्या त्या पात्राने माझ्या मनावर अनेक 'खोल' परिणाम केलेले आहेत.

7 comments:

Anonymous said...

sahee re Milind...
दिसामाजी काहीतरी ते लिहावे ।
प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ॥
ase samarthannech mhaTale aahe :)

Nandan said...

Chhaan.

"एखाद्या गोष्टीसाठी वाहून घेणे" हा शब्दप्रयोग कदाचित नदीच्या प्रवाहावरून तर नाही आला? जनसेवेसाठी तिने स्वतःला वाहून घेतलेले असते.
-- he vishesh aavaDale.

गिरिराज said...

surekh! naMdanapramaaNech maajhehI mat aahe! :)

Anonymous said...

Gr8 mihi k.t.h.m.la hoto ani mala dingi boat avdayachi. Mi ani maza mitra lecture bunk karun boating karayacho. to area sundarach ahe.

Milind said...

सर्वांना धन्यवाद.
पंकज,
अरे वा, मजा केलीये तुम्हीसुद्धा. तिथे rowing करण्याचीही माझी ईच्छा होती, पण तेव्हा अजून पोहायला येत नव्हते :(

Anonymous said...

तुझी ही पोस्ट वाचून दोन गोष्टी सांगाव्याशा वाटल्या...

१. आज सकाळीच fm rainbow दिल्ली केंद्रावर एक बोधकथा ऐकली. गौतम बुद्ध एका नदीकिनारी बसले होते. त्या वाहत्या नदीला पाहून तुझ्याप्रमाणेच त्यांच्याही मनात विचारप्रवाह सुरू झाले. तिथेच पडलेल्या आणि अडथळा निर्माण करणाऱ्या एका दगडाला पाहून त्यांना वाटले, 'इतरांना अडथळा निर्माण करणारे स्वतः कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. आणि इतरांना मदत करणारे या नदीप्रमाणे पुढे पुढे जात राहतात...

२. गोदेचं नाव काढून तू माझी आगदी भावनिक तार छेडलीस! मी मूळचा औरंगाबादचा.. गोदावरीचं पाणी पिऊन लहानाचा मोठा झालो. इथे मिळणाऱ्या bottled पाण्याने अजिबात तहान भागत नाही रे... गोदावरीच्या पाण्याची गोडी काही औरच....

असो. तुझी पोस्ट कशाविषयी आणि मी काय भलतंच लिहीत बसलोय... असं होतं बघ घरापासून दूर गेल्यावर...

Milind said...

आशिष, "इतरांना मदत करणारे या नदीप्रमाणे पुढे पुढे जात राहतात" हा विचार फार सुरेख आहे.
आणि घरापासून दूर असलो तरी मराठी blogs सारखे माध्यम आहेच की आपल्याला अशा विचारांची देवाणघेवाण करायला :)