Sunday, August 13, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

मला ह्या खेळात Akira ने सामील करून घेतले.
खेळाविषयी अधिक माहिती करता हे पहा :

१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक.
'मी एक शून्य' - पु. ल. देशपांडे

२. वाचले असल्यास त्याबद्दल थोडी माहिती.

पु.लं.चे philosophical, गंभीर लेखनही किती चांगले आहे ते शब्दांत सांगता नाही येणार. त्यांच्या लेखनसामर्थ्याचा हा पैलूही खूप प्रभावी आहे. तसे अंतू बर्वा सारखे लेख वाचून याची कल्पना पूर्वी आली होतीच.
या पुस्तकातल्या काही कथा खूप आवडल्या.

३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी/(इतक्यात वाचलेली) ५ पुस्तके.

मृत्यंजय - शिवाजी सावंत
ययाति - वि.स. खांडेकर
बट्याट्याची चाळ - पु.ल.
विज्ञानकथायात्रा - नारायण धारप (बालपणी वाचलेले पहिले Science-fiction book)
काजळमाया - जी. ए. कुलकर्णी

४. अद्याप वाचायची आहेत अशी पुस्तके:

अनेक वैविध्यपूर्ण विषयांची आणि लेखकांची पुस्तके वाचायचा विचार आहे. सध्या ही मनात आहेत:
मौनची भाषांतरे -संदीप खरे
पु.लं.ची ऊरलेली बरीच पुस्तके.
एका मुंगीचे महाभारत - गंगाधर गाडगीळ

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे.
कुसुमाग्रजांचे विशाखा मी अनेकवेळा वाचले आहे.अजूनही वाचतो. कोलंबसाचे गर्वगीत, कणा अशा कवितांनी (लहानपणापासून वाचत असल्याने) खूप प्रभावित झालो आहे.


ह्या खेळात सहभागी व्हायला मी ह्यांना निमंत्रित करतो:
१.अभिजीत
२.आशिष अनिल
३.मंदार
४.मंजिरी
५.मिलिंद

7 comments:

Milind Phanse said...

मला ह्या खेळात सहभागी करून घेतल्याबद्दल तसेच माझ्या ब्लॊगवर (गुंजारव) नोंदवलेल्या अभिप्रायाबद्दल आभार.

Milind said...

मग येऊ द्यात तुमची खेळी!
अशा खेळांनी marathiblogs.net वर खेळी-मेळीचे वातावरण जरूर वाढेल.

abhijit said...

मी माझी खेळी खेळली कि तुला कळवतो. आभारी आहे.

Milind said...

जरुर लिही, मी वाट पाहीन.

Manjiri said...

मला tag केल्याबद्दल धन्यवाद!
मी माझी खेळी काही दिवसापुर्वी खेळले.

http://rainbasera.blogspot.com/2006/05/blog-post.html

नंदन ने किती छान tag केले आहे नाही?

abhijit said...

हम अपनी बाजी खेल चुके है!

महेश मसुरकर said...

asmaadikaas hee hyaa kheLaat saamil vhaayalaa nakkee aavaDel..
haa aataa aamhee hyaa kheLaatale jaaNakaar naaheech aahot, paN tarihee..
blog var abhipraay lihilyaabaddal aabhaaraachaa bhaar Taakat naahi, bar kaa milindaa..