Monday, August 14, 2006

नक्षत्र दर्शन

बंगलोरला मी IISC मधल्या मित्रांच्या भेटीस गेलो होतो तेव्हाची गोष्ट. पूर्वी एक-दोनदा जाऊन आल्यामुळे त्यावेळी मुख्य गेट पासून त्यांच्या dept पर्यंत एकटंच जायचे ठरवले. अंधार पडायला सुरुवात झाली होती. कुठेतरी मी रस्ता चुकलो. योग्य दिशेने जात राहिलो तर काय फरक पडतो या माझ्या समजुतीवर पश्चात्ताप करायची वेळ आली होती. कुठलाही रस्ता अन्‌ dept जवळ नव्हते. आता सभोवती पूर्ण अंधारलेले होते. थोडे अजून पुढे गेल्यावर एक रस्ता दिसत होता. तिकडे जाणारा एक रस्ता मात्र दाट झाडांमधून जात होता. अन्‌ आधीच्या भेटींत दिवसा मी त्या वनश्रीची खूप स्तुती केली होती.आता मी काही भूताखेतांवर विश्वास ठेवत नाही पण साप अन्‌ विंचवासमोर जायची कोण हिंमत करतो? काहीतरी आकडे मोजत मी तिकडे गेलो.

आणि काय सांगू तुम्हाला, काजव्यांच्या थव्यामध्येच मी जाऊन पोहोचलो. चहूबाजुंनी लुकलुकणाऱ्या अन्‌ फिरणाऱ्या काजव्यांचे विलोभनीय दृश्य पाहून मी अवकाशातल्या तारकापुंजामधून भ्रमण करतोय असा भास झाला. मी तसे मी बरेच trek, trips केल्या असूनही एकसुद्धा काजवा पाहीला नव्हता. आंधळा मागतो एक आणि देव देतो अनेक असे झाले. त्या इवल्या-इवल्या काजव्यांनी माझे डोळे चांगलेच उघडले! निसर्गाच्या सौंदर्याचा पुरेपूर अनुभव घ्यायला निसर्गाच्या कुशीत जाणे जरूरी आहे ही समजूत तेव्हा मनावर चांगलीच कोरली गेली.

2 comments:

Akira said...

Wa farach manohar drushya asel te!

Milind said...

हो ना. पुन्हा अशा जागी जायला मला आवडेल.