Monday, January 22, 2007

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...

तुझ्या सोबतीच्या पालखी मखमली
तुझ्या विरहाच्या अवजड पखाली

दोन्हीही मिरविल्या मी काळजावरी
होईन तुझ्या पंढरीचा मी वारकरी

का तू मज अशी सोडूनी दूर दुर गेली
सजवतोय रित्या पालखी अन्‌ पखाली

--------------------------------------

शीर्षक ह्या गाण्यापासून घेतले आहे.
याच शीर्षकाचे एक विनोदी विडंबन ईथे पहा.

No comments: