सोनसायंकाळी
एकतर सूर्योदयानंतर उठायचीच सवय. त्यात थंडीचे दिवस आहेत.
म्हणून 'सोनसकाळी' अशी कविता लिहायला अजून तरी अवकाश आहे.
:)
तर एका मैदानावर सूर्यास्तावेळी जेव्हा मी फेरफटका मारायला जातो, तेव्हाचे दृश्य शब्दांत पकडण्याचा हा प्रयत्न.
पक्षी परतत असतात, फुटबॉलचा खेळ चालू असतो, ई.
सोनसायंकाळी
रम्य त्या सायंकाळी
गालीच्यावर मी हिरवळी
सांजवेळचे पाहून ते नभरंग
उमटती मनपटलावर नवरंग
जलदाभोवतीची सोनेरी झळाळी
सुखद कारंजांची मनात उसळी
वेगवान ते खेळाडूंचे पददालित्य
चेंडूचेही चाले चैतन्यमयी नाट्य
सभोवताल जरी होई अंधकारमय
तन-मन होऊन जाई तेजोमय
या विशाल दृश्याचे 'दर्शन' घेऊनी
वाटेतल्या मंदिरास जाई मी विसरुनी
---------
याच दृश्याचे मी ईथेही ईंग्रजीतून वर्णन केले आहे.
No comments:
Post a Comment