Friday, January 05, 2007

बोलकी डायरी

लहानपणीच्या काही रंजक कथा अशा असायच्या:
बोलके झाड, बोलका दरवाजा, ई.
आता बोलकी डायरी असे काहीतरी लवकरच प्रत्यक्षात येईल.
त्यात तसे काही फार विशेष नाही, कारण आजकालचे तंत्रज्ञान फार प्रगत झाले आहे.
किंबहूना ईंग्रजीसाठी मी सांगतोय तसे उपकरण अस्तित्वात असेलच.

तर खास बात ही की आपल्या मायमराठी साठी या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी संशोधन चालू आहे.
Handheld devices तुम्हाला माहीत असतीलच. त्यावर एका काडीने (stylus) मराठीत लिहा.
मग ते उपकरण तुमचे अक्षर ओळखून त्याचा मजकूर तयार होईल.
त्यानंतर मराठीच्या Text-to-Speech ने ते तुम्हाला वाचून दाखवेल.

तसेच मराठीच्या OCR (Optical Character Recognition) वर सुद्धा काम चालू आहे.
मग असेही होईल की एखाद्या मराठी कादंबरीची digital copy आपण अशा उपकरणात टाकू, अन्‌ प्रवासात हेडफोन लावून निवांत ऐकत बसू.
आहेना मजेशीर?

अस्मादीकांचा एक मित्र अशा कामात गुंतला आहे. फारच गुंतागुंतीचे काम आहे म्हणे!

1 comment:

अनु said...

Va ase zale tar khup maja yeil.