Tuesday, December 12, 2006

लढाई

चंद्राच्या चेहऱ्यावर नसती डाग
त्याचा लढाईचा ते असती भाग

झेलुनही उल्कापात नाही तो हरला
ज्वाला न उफळता केवळ विवरला

शमवून क्रोध ठेवी प्रकाश शीतल
सुखवे जनी लपवूनी आपले खल

निशेच्या नभी चंद्रामुळेच शोभा
अन्‌ धरेवरही बहरे काव्यप्रतिभा

चंद्राच्या चेहऱ्यावर नसती डाग
त्याचा सौंदर्याचा ते असती भाग


--------------------------------------
"जे न देखे रवी ते देखे कवी".
काय, पटतेय ना हे?
:)

1 comment:

Anonymous said...

सुंदर कल्पना आणि सुरेख कविता, मनापासून आवडली! :)