मराठीत ९१ मार्क!
मराठीत माझी मार्कांची गाडी नेहमीच ७० ते ८० या स्टेशनांमध्ये अडकायची.
जाम complex वाटायचा त्या वेळी..कारण इतर विषयांत मला भरपूर मार्क असायचे.
पुढे माझ्या इंजिनियरींग कॉलेजात मराठीत ९१ मार्क मिळालेला मुलगा आहे असे कळले.
त्याचे अक्षर इतके छान होते की जणू तो एक छापखाना असावा.
पण फक्त अक्षराने कसे काय असे होईल?
त्याला मग मी विचारायचेच ठरवले.
"तू काही परीक्षेत खास तंत्र वापरलेस का?"-मी.
"विशेष काही नाही रे, फक्त माझ्या निबंध लेखनाने फरक पडला असेल"-तो.
"कसे काय?"
"अरे, ३ निबंधांपैकी मी 'सर्कशीतल्या हत्तीची आत्मकथा' हा विषय निवडला."
"मग?"
"आणि पेपरात सगळ्यात आधी निबंध लिहिला. त्यात हत्तीचे अगदी दारूण मनोगत लिहिले. त्यामुळे तपासकाला 'emotionally capture' करण्यात मी यशस्वी झालो असेन."
-यावर मी निरुत्तर!
(आणि हो- मराठीत ९१ मार्क मिळवणाऱ्याने 'emotionally capture' हेच शब्द वापरले होते.)
2 comments:
This guy is M.B. I am sure :-)
Mala hi vatayche ki majhe marathi khup changle aahe aani tari hi mala marathi madhe 80 chya var kadhi marks milale nahit. :-( Tumcha ha blog vachtana tyachi athavan jhali. :-)) Baki 'emotionally capture' karnyacha majha tari praytna kadhi safal jhala navta. :-))
Vidya.
Post a Comment