मराठी in Globalization
Globalization च्या युगात मराठीचे स्थान काय असावे याबद्दल बराच वाद-विवाद करता येईल.
कालच्या Times of India मध्ये द. मा. मिरासदारांनी याबाबत व्यक्त केलेले मत वाचनीय आहे.
त्यातल्या एका वाक्याशी तर मी पुर्णपणे सहमत आहे:
He, however, clarified that he did not insist on making Marathi a ‘knowledge language’ when English already exists as one.
(click to enlarge)
या युगात मराठीचा अर्क आपण जपावा. त्यात लिहिल्या गेलेल्या महान साहित्यकृतींचे (काही महान विचारांचे, काव्यांचे) इंग्रजीमध्ये translation करावे. काही शब्द आता येणाऱ्या पिढीला क्लिष्ट वाटतील, त्यामुळे ते अवजड ओझे काढून भाषा रंजक करावी.
याऊलट मराठीत भाषांतर करणे (knowledge, technological terms mainly) म्हणजे काळाच्या उलट्या दिशेने जाणे आहे असे मला वाटते.
काव्य वगैरे रचावे तर तेही सोप्या भाषेत.
I agree that one can think of certain audience to the marathi translation..e.g. people in remote rural areas, old age people..
पण अशा लोकांना जर technological गोष्टी शिकण्याची कुवत/गरज असेल तर जुजबी इंग्रजी शिकणे नक्कीच शक्य आणि योग्य आहे.
त्यानंतर तर त्यांच्यासाठी ज्ञानाची अनंत दालने उघडतील.
उदा. LAN = संगणकांचे छोटे जाळे असे काहीतरी सांगीतले तर ईग्रजी शिकण्याची गरज जाते.
पण LAN = a small network of computers हे काही जास्त अवघड नाही.
असो, मी पामराने आपले मत व्यक्त केले. काळच ठरवेल की भाषेचे काय स्थान राहते ते.
1 comment:
लई झ्याक.
I mean एक'झ्याक्ट'ली!
Post a Comment