भाषांतराची गरज...
कालच्या टाईम्स ऑफ ईंडीया पुणे मधली ही बातमी पहा (लेखाच्या शेवटी):
मला तर वाटते की जे जे मराठी चांगले साहित्य आहे ते सर्व हळूहळू का होईना भाषांतरीत करायला हवे.
अर्थात त्यासाठी मराठी जतनाचा अट्टाहास सोडावा लागेल, मराठीतील काही उत्तम वाक्प्रचार, म्हणी, अलंकार सोडावे लागतील..
पण भाषांतरामुळे साहित्यामधील काही उच्च विचार, कल्पना, ई. नव्या पिढीला सहज सोपवता येतील..
हे सर्व ईंटरनेटवर ठेवले तर अजूनच चांगले. एका अर्थाने इथे एका प्रकारचा स्वार्थत्याग करण्याची गरज आहे.
आईवडील नाही का लहान लेकरांसाठी असा त्याग करत?
मी अजून एवढा मोठा नाहीये की असा अनुभव आलाय, पण जे समजू शकतो ते लिहिलेय :)
याविषयी मी आधीही लिहिले आहे. हे पहा.
पण यात एक मुख्य शंका आहे ती copyright ची. ईतक्या सर्व लेखकांची परवानगी घेणे म्हणजे जिकीरीचे.
आणि हे काम करणार कोण? सर्व ब्लॉगर्सने जर हे काम वाटून घेतले तर?
नाही तरी Linux operating system अशीच तयार झालीये.
No comments:
Post a Comment