वळणे
मन मारणे जमत असेल सहजच कोणाही माणसाला
मारावे कसे काव्याला, कुणी सांगेल का जरा मला?
आसवांची कासवे नाही पोहोचत डोळ्यांपलीकडे
पण भावनांचे सारे ससे धावतातच काव्याकडे!
आसवे लपवून हसून दाखवण्यात असेलही पुरुषार्थ
पण कवितेच्या शब्दांतच फुलती भावनांचे मतीतार्थ
काही जुने रस्ते जेव्हा दुरावलेले होऊन जातात
अशा ओळींसाठीच का पुढच्या आशा थांबतात?
जुन्यासाठी का उगाच जळणे-त्याहून बरे पुढे पळणे
आयुष्याच्या वाटेत येतच असतात ही नवनवी वळणे
-मिलिंद
2 comments:
very very nice ...
खुपचं सुरेख !!
Post a Comment