बगिचा
हरखलो मी पाहूनी तिच्या गॅलरीतला बगिचा बहरलेला
जाई, जुई, गुलाब, चमेली अन् मोगराही होता फुललेला
मी विचारले, "कुठले बीज अन् कुठले खत वापरलेत हो?
"तर खुदकन् हसुनी म्हणते ती, "काहीही विशेष नाही हो!"
मी-"सगळे नका सांगू, पण काही टीप्स तरी द्या की"
ती-"त्यामागे माझी मेहनत आहे, तुम्हीही घ्या की!"
मी-"घेतली ना, रोपांना पाण्यापेक्षा घामच जास्त दिला!"
ती-"असे का, मग सांगतेच थोडेशी माहीती मी तुम्हाला"
"मी रोज या रोपांजवळ बसून मन मोकळे करते
त्यांना माझ्या दिवसभरातले हसू अन आसू देते"
"आता त्यांना माझे हसू की आसू आवडतात
हे न कळले, पण त्यावाचून ती कोमेजतात!"
मी-"वाहव्वा, तर ही अशी भानगड आहे
पण माझ्यासाठी हे फारच अवघड आहे!"
"कितीही प्रयत्न केला, देवाचीही जरी केली मनधरणी
तरी अश्रूंचा दुष्काळच असे आम्हा पुरुषांच्या नयनी!"
-मिलिंद
No comments:
Post a Comment