Thursday, August 17, 2006

मंथन

प्रश्नचिन्हे जेव्हा डोळ्यासमोर नाचतात
फणा काढून माझ्या काळजाला डाचतात

विचार मंथनास मग ती करती प्रवॄत्त
त्या अमॄतप्राशनाने होई मग मी संतृप्त

स्पंदनांच्या गुंजनात उमटते सृजन गीत
दंगते तन-मन अन्‌ जडते जीवन प्रीत

-मिलिंद

4 comments:

Sumedha said...

छान, प्रश्नांपासून जीवन-प्रीतीपर्यंतचा प्रवास सुखकर होउदे!

Milind said...

हा हा..धन्यवाद, धन्यवाद.
2 in 1 comment आहे म्हणून दोनदा धन्यवाद :)

Akira said...

Milind,

Kavita awadali. :)

Anonymous said...

सुमेधा आणि अकिराशी सहमत. कविता सुंदर झाली आहे.