कोपऱ्यातले
परवाचीच गोष्ट. पोहे करायला म्हणून कांदा कापायला घेतला आणि मग डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहायला लागलं. मग जाणवलं की रडण्याची इच्छा मनाच्या एका कोपऱ्यात खूप दिवसांपासून घर करून आहे. मग डोळ्यांनी मनसोक्त रडून घेतलं..पण- पण तरीपण मनाचं रडायचं राहुनच गेलं की..
असो. कधीतरी सुदैवाने वा दुर्दैवाने ही हौसही पूर्ण होईल :)
घरच्या शो-केस मध्ये लहानपणी मिळालेला एक कप आहे. एका राज्यस्तरीय निबंधस्पर्धेत मिळालेल्या पारितोषिकाचा. तसे ते उत्तेजनार्थ पारितोषिक आहे, पण म्हणूनच की काय तेव्हापासून लेखनाला खूपच उत्तेजना मिळाली आहे :)
जेव्हा त्या कपाकडे पाहतो तेव्हा जाणवतं की मनाच्या अजून एका कोपऱ्यात तसे पारितोषिक मिळवायची ईच्छा अजूनही आहे. बापरे, माझ्या मनाला किती कोपरे आहेत असे! आता वाचकांनी माझ्या blog वर दिलेल्या अभिप्रायांमुळे एक प्रकारे तसे पारितोषिक मिळाल्याचाच आनंद होतो. वाचकांनी उधळलेल्या स्तुतीसुमनांनी माझ्या 'गुलकंदा'च्या सौंदर्यात खास भर पडते. आणि blogger पुणेकर असो, मुंबईकर असो, वा अमेरिकन- तो वाचकांच्या अभिप्रायांनी नक्कीच सुखावत असेल. कोणीतरी म्हटलेच आहे की रसिकाशिवाय कला ही अपूर्ण असते.
3 comments:
नक्कीच!
रसिकांसाठी कला की कलेसाठी रसिक हा मात्र वादाचा मुद्दा ठरू शकेल...
very nice post :) u are writing very well these days :)
Ajit, Sheetal, धन्यवाद!
रसिक वाचकांची दाद म्हणजेच 'एक-नंबर' उत्तेजनार्थ पारितोषिक :)
@Ajit:
मला वाटते कला-रसिक हे नाते कलाकार अन् रसिकपरत्वे वेगवेगळे असते.
रसिक उत्तेजना देतातच, पण कलेचा प्रेरणास्रोत वेगवेगळा असतो. कधी तो रसिकांची उत्तेजना हाही असू शकतो.
Post a Comment