पुणेरी पाटी
घराबाहेर दरवाज्याजवळच आम्ही कचऱ्याचा डबा ठेवतो.
कचरा गोळा करणारा सोसायटीतल्या सगळ्यांच्या दरवाज्याजवळचा डबा रिकामा करुन ठेवतो.
रोज संध्याकाळी ऑफिसमधून आलो की दरवाज्यावर १-२ माहीतीपत्रके लावलेली असतात.
(कारण सुदैवाने दाराला खाली फट नाहीये)
सेल, नविन दुकानाचा शुभारंभ ई.
सध्या निवडणूकांचे दिवस असल्याने तर अशा पत्रकांची संख्या खूप वाढली आहे. हळदी-कुंकवाचा कार्यक्रम (अर्थातच निवडणूक प्रचारासाठी) ई.
बहूतेक सर्व पत्रके आम्ही न वाचताच दरवाजाच्या कडीवरुन काढून बाजूच्या कचरापेटीत टाकतो.
आता दरवाज्यावर अशी पाटी लावायचा मोह होतोय:
कृपया दरवाज्यावर कुठलीही माहीतीपत्रके लावू नयेत,
सर्व माहीतीपत्रके बाजुच्या कचऱ्याच्या डब्यात टाकावीत.
:)
हे जरा जास्तच उद्धट होईल म्हणून प्रत्यक्षात असे काही केले नाहीये.
पण कुणाला अशी पाटी लावायची असल्यास अवश्य लावा.
हीचे copyright न घेता ती मी open-source करतोय :)
2 comments:
good one :)
पाटी जरुर लावणे
Post a Comment