Tuesday, September 18, 2007

फोना-फोनी

बस प्रवासात दिसली
शेजारी येऊन बसली

फोनवर गप्पांत जी सुरु झाली
बॅटरी संपल्यानंतरच थांबली

त्यानंतर माझ्याशी बोलायला सुरु झाली
मला बोलू न देता स्वत: भरपूर बोलली

मग एका मित्राचा फोन देवासारखा धावून आला
संपल्यावरही मी तो बराच वेळ कानाला लावला

जातांना ती गोड हसली अन् म्हटली
तुझ्याशी बोलायला खूप मजा वाटली

बोलत जाऊ आपण- साधी ख्यालीखुशाली
हा माझा नंबर आणि माझे नाव 'अबोली'!

नंबर बदलेन मी, तिचा फोन येईल या भितीमुळे
अजून ठरत नाहीये तिच्या आवाजाच्या गोडीमुळे

-मिलिंद