Friday, June 27, 2008

वैचारीक, पण सुखद सिनेमा

सनई-चौघडे हा मला नावावरून काहीसा 'यंदा कर्तव्य आहे' सारखा असेल असे वाटला.
मध्यंतरापर्यंत बऱ्याच गोष्टी जरा जास्तच 'ligthly' घेतल्या जात आहेत असे वाटले. आणि त्यानंतर सिनेमा अगदी serious होणार असे वाटायला लागते.
पण काही अवघड विषयसुध्दा जसे अगदी सहजपणे, तरीही योग्य प्रकारे हाताळलेले आहेत ते पाहण्यासारखे आहे.

आपण स्वाभाविकपणे आयुष्यातले काही अवघड रस्ते टाळतो, पण काही अवघड परीस्थितींना face करावेच लागते - अगदी तोंडाला फेस आला तरी :)

या सिनेमातली काही वाक्ये अगदी मार्मिक आहेत:
"फक्त दाढी-मिशा ठेवायच्या आणि बायकांना नाचवायचे हाच पुरुषार्थ का?","सगळे पुरुष सारखेच असतात" -ईती नायिका

"सगळे पुरुष सारखेच असतात, पण एकसारखे नसतात" -ईती नायक

आणि हो, अख्खा चित्रपटभर जो 'कांदे-पोहे' चा गजर सुरु असतो, त्यनुसार या चित्रपटाचे नाव 'कांदे-पोहे' ठेवले असते तरी चालले असते :)

माझी rating: ***1/2 (3.5/5)

2 comments:

Bhagyashree said...

hey hi.. baryach janana ha movie farsa awdla nahi asa eikale.. mhaje baray.. mi ajun baghitla nahi.. pan kahi goshtinmadhe sudharana ahe asa distay.. baghin kadhitari..

btw, ya movie ch nav kandepohe ch hota..for some reason te sanai chaughade asa change zala..

Milind said...

बराय असे म्हणता येईल, कारण असे वेगळ्या विषयावरचे मराठी सिनेमा मोजकेच येतात.
सिनेमाच्या बाबतीत भाषेला महत्व नसावे, पण हा सिनेमा लग्नाच्या विषयावरचा आहे